इंदिरा गांधी वृद्धापकाळ, इंदिरा गांधी दिव्यांग, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना –



राज्य सरकारमार्फत दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी या योजनांतील अंदाजे १२०० ते १३०० लाभार्थ्यांची शिफारस, तसेच केंद्र सरकारमार्फत २०० ते ३०० लाभार्थ्यांची शिफारस करण्यात येणार आहे. मात्र, ही शिफारस फक्त डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करणाऱ्या लाभार्थ्यांनाच लागू होईल.

सदर सर्टिफिकेट आपण प्ले स्टोअरवर उपलब्ध Beneficiary Satyapan App च्या माध्यमातून घरी बसूनही काढू शकता किंवा जवळच्या सेतु केंद्रामध्ये जाऊनही काढता येऊ शकते.

तसेच सर्व केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले डिजिटल लाईफ सर्टिफिकेट अनिवार्यपणे काढावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभाग, तहसील कार्यालय नांदुरा यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

🟢 श्रमिक बाल संजय गांधी योजना व अशाच प्रकारच्या इतर योजनांमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांना मात्र हे सर्टिफिकेट सादर करण्याची गरज नाही. त्यांनी आपली यादीत नोंद तपासावी.

या संदर्भात अडचण आल्यास तहसील कार्यालयातील सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधावा.

- तहसीलदार, नांदुरा


إرسال تعليق

أحدث أقدم