📰 लासलगाव रेल्वे स्टेशन रोडवरील खड्ड्यांचा विळखा – नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा



लासलगाव (ता. निफाड) –
लासलगाव रेल्वे स्टेशन रोड लगतच्या धोकादायक खड्ड्यांमुळे अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर सर्वत्र झालेल्या खोल खड्ड्यांमुळे लोखंडी सळ्या व गज उघडे पडले असून ते अपघाताला जणू आमंत्रण देत आहेत.

या पार्श्वभूमीवर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय भालके, दिलीपराव पानगव्हाणे, बाजीराव वाघ, कुंदे पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन उघड्या लोखंडी गज व सळ्या काढून रस्ता मोकळा केला.

नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीव्र संताप व्यक्त करत त्वरित खड्ड्यात सिमेंट टाकून रस्ता सुरळीत करण्याची मागणी केली आहे. "जर शासन व प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर येत्या 15 ऑगस्ट रोजी या खड्ड्यांमध्ये भव्य वृक्षारोपण करून जनआंदोलन छेडण्यात येईल", असा ठाम इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

हे आंदोलन राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, स्वाभिमानी सेना, जनसेवक, मा. श्री. डॉ. शेरूदादा सादिकभाई मोमीन सोशल फाउंडेशन तसेच लोकशाही मराठी पत्रकार संघ नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांच्या वतीने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

👉 लासलगावच्या नागरिकांचा हा बुलंद आवाज प्रशासनाला जागे करतो का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم