नांदुरा, दि. ०२ ऑगस्ट –शिवसेना पक्षाचे नेते तथा केंद्रीय आयुष्य व कुटुंब कल्याण मंत्री (स्वतंत्र प्रभार), खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या शुभहस्ते नांदुरा शहरातील गोकुळ कवळे यांची शिवसेना वाहतूक सेना नांदुरा शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती सोहळ्याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष डीवरे, तालुकाप्रमुख सुनील जुनारे, शहरप्रमुख अनिलभाऊ जांगळे, उपशहरप्रमुख महादेव सपकाळ, शहर संघटक जितू जुनगडे, युवा सेना शहरप्रमुख हरीश काटले, वैद्यकीय मदत कक्ष शहरप्रमुख शुभम ढवळे यांच्यासह महेंद्र वानखडे, देवेंद्र जयस्वाल, युवा नेते दत्ताभाऊ येनकर, महेश उंबरकर, संभाजी वसे, राजेश ताकवाले, पवन जांगळे, सचिन पुंडे, निलेश लहुडकर, अतुल काळे, आशिष ताकवाले आणि इतर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. गोकुळ कवळे यांची ही निवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व अनुशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, त्यांच्या पुढील कार्याला शिवसेना परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
