धामणगाव बढे वीज वितरण कार्यालयातील हलगर्जीपणाविरोधात नागरिकांचे निवेदन सादर; समस्यांच्या तात्काळ निवारणाची हमी, अन्यथा आंदोलनाचा इशारा


धामणगाव बढे (ता. मोताळा) – येथील व परिसरातील वीज ग्राहकांनी आज दिनांक 4/08/2025] रोजी धामणगाव बढे वीज वितरण कार्यालयातील कामचुकारपणा, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी कारभार आणि ग्राहक हक्कांची होणारी पायमल्ली याविरोधात उपविभागीय वीज अभियंता, उपविभाग मोताळा यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष मा. गजानन घोंगडे, काँग्रेस पक्षाचे मोताळा उपाध्यक्ष अॅड. वसीम बिस्मिल्लाह कुरेशी, एमआयएम तालुका अध्यक्ष आरिफ खान, ज्येष्ठ पत्रकार रहीमभाई, जफर पटेल, जावेद पटेल व अनिल रेवकर यांचा समावेश होता.
निवेदनात पुढील गंभीर समस्या मांडण्यात आल्या:

डी.पी. दुरुस्ती व वारंवार होणाऱ्या फॉल्टचे कायमस्वरूपी निवारण होत नाही.

पावसाळ्यापूर्वी वृक्षतोड व देखभाल होत नाही.

अधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहतात व लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नाहीत.

ग्राहकांना उलटसुलट उत्तरे दिली जातात.

कार्यालयात मुक्कामी निवासी अधिकारी/कर्मचारी नाहीत.

कार्यालयीन ड्युटी वेळा जाहीर नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.


या निवेदनाद्वारे धामणगाव बढे येथील रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता पदाच्या तात्काळ भरतीसाठी अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की ७ दिवसांत सर्व प्रलंबित समस्या सोडवण्यात येतील. अन्यथा, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी व उपस्थित प्रतिनिधींनी दिला.

स्थानिक नागरिकांमध्ये वाढती अस्वस्थता व असंतोष लक्षात घेता महावितरण कंपनीने तात्काळ लक्ष घालणे आवश्यक आहे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم