💥 *शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहर तर्फे पोलिसांना राखी बांधून कर्तव्यनिष्ठेला सलाम* 💥


    नांदुरा: रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ-बहीण यांच्यातील नात्याचा नसून, समाजातील खऱ्या अर्थाने “रक्षक” असलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. या भावनेतून शिवसेना महिला आघाडी, नांदुरा शहरच्या वतीने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात आणि भावनेने साजरा करण्यात आला.या प्रसंगी महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती आपुलकी, सन्मान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. पोलीस बांधव दिवसरात्र प्रामाणिकपणे कर्तव्य बजावताना स्वतःच्या कुटुंबियांपासून दूर राहतात, अनेक संकटांचा सामना करतात, आणि प्रत्येक नागरिकाची सुरक्षा हीच आपली जबाबदारी मानतात.
                 राखीच्या या धाग्यात फक्त प्रेम आणि नात्याची गाठ नसते, तर जबाबदारी, संरक्षण आणि विश्वासाचीही घट्ट बांधणी असते. पोलिसांच्या मनगटावर बांधलेली ही राखी त्यांना समाजरक्षणाच्या कार्यात अजून प्रेरणा देणारी ठरावी, हाच उद्देश या उपक्रमामागे होता.या उपक्रमात *शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहर प्रमुख सौ.सरिताताई प्रकाश बावस्कार, उपशहर प्रमुख सौ.प्रज्ञा अरुण तांदळे, सचिव सौ.भावनाताई सोनटक्के, सदस्या सौ. ज्योतीताई राखोंडे,कु.विजया बावणे यांच्यासह महिला आघाडीच्या अन्य कार्यकर्त्या* उत्साहाने सहभागी झाल्या.
पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी महिला आघाडीच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.“असा सन्मान आमच्यासाठी केवळ अभिमानाचा नाही, तर कर्तव्य पार पाडताना मिळणाऱ्या प्रेरणेचा स्रोत आहे,”असे त्यांनी सांगितले.तसेच *राखीच्या धाग्यातून आणि औक्षणाच्या परंपरेतून उमटलेला हा विश्वास आणि सुरक्षिततेचा संदेश समाजात सदैव जिवंत राहो,* असे मत सरिताताई बावस्कार यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने