नांदुरातील AIMIM सभा: आरोपांच्या भोवऱ्यात नेते, गप्प कार्यकर्ते, आणि हरवलेली जबाबदारी.



२० जुलै २०२५ रोजी नांदुरा शहरात झालेली आल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ची सभा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेबाबत काही गंभीर आरोप समोर येत आहेत – आणि या आरोपांनी पक्षाच्या नितीमत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सभेच्या खर्चासाठी भारतीय जनता पक्षाच्या एका नेतेकडून ₹ ५१०००/- ची रक्कम देण्यात आली. एवढंच नव्हे, तर सभेसाठी लावलेल्या शामियान्याचा खर्च भागवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या नेतेकडून ₹ ६०००/- दिले – याच्या बदल्यात अशी अट होती की सभा संपल्यानंतर इम्तियाज जलील यांना त्यांच्या फार्महाउसवर घेऊन जावे. आणि नेमकं तेच झालं.

हे सगळं घडलं असतानाही AIMIM च्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच

जबाबदार नेते आणि पदाधिकारी आश्चर्यकारक शांत आहेत. ना कुठली अधिकृत प्रतिक्रिया, ना कोणाला जबाबदार धरलं गेलं, आणि ना कोणाला पक्षातून निलंबित करण्यात आलं. या प्रकारामुळे समाजात असा संदेश जातो आहे की आरोप बिनबुडाचे नाहीत – आणि ही शांतता, एकप्रकारे, सत्याची कबुली आहे.

"मिल्लत"च्या नावाने मते मागणारा पक्ष, आज "मिल्लत"च्या भावनांशी गद्दारी करतो आहे.

आज जेव्हा मुस्लिम समाज एकजुटीच्या आणि विश्वासार्ह नेतृत्वाच्या शोधात आहे, तेव्हा AIMIM सारख्या पक्षाकडून आलेली ही वागणूक अत्यंत निराशाजनक आहे. कार्यकर्त्यांनी समाजाच्या प्रेमाची आणि भावनांची गाठोडी उचलून ज्ञानगंगा नदीत विसर्जित केली आहे, असं चित्र सध्या उभं राहतंय.

आपण समाजाच्या "रेहबर" असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनी जर राजकीय सोयीसाठी दुसऱ्या पक्षांकडून आर्थिक मदत घ्यावी, आणि त्याबदल्यात वैयक्तिक सोयी पुरवाव्यात – तर मग असा पक्ष आणि त्याचं नेतृत्व समाजासाठी कितपत उपयोगाचं राहिलं, हा विचार करण्याची वेळ आली आहे.

या घटनेनंतर जर AIMIM च्या बुलढाणा जिल्ह्यातील नेत्यांनी अजूनही मौन बाळगलं, तर समाजालाच आता आपली दिशा आणि नेतृत्व नव्याने ठरवावी लागेल.

अब्दुल रफीक शेख (आर टी आय एक्टिविस्ट नांदुरा)


إرسال تعليق

أحدث أقدم