📰 ग्रामीण कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन प्रवेशातून सवलत द्यावी – अॅड. वसीम कुरेशी यांची शिक्षण मंत्र्याकडे लेखी मागणी



बुलडाणा, दि. १८ जुलै:
संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांना सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन ११वी प्रवेश प्रक्रियेतून तात्पुरती सवलत देण्यात यावी व स्थानिक शासकीय यंत्रणेला ऑफलाईन मेरिट यादीवर प्रवेश देण्याचे अधिकार देण्यात यावेत, अशी ठोस मागणी अॅड. वसीम कुरेशी यांनी शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या महत्वाच्या विषयावर सामाजिक शैक्षणिक हितार्थ सेवा करणारे मंडळीनी लक्ष ठेवले गरजेचे आहे.त्याच बरोबर महाराष्ट्र शिक्षण संचालक व सर्व शिक्षणाधिकारी यांनी देखील याची गांभीर्य पूर्वक नोंद घेऊन कारवाई करणे गरजेचे.

गेल्या दोन महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया सुरु असली तरी ग्रामीण भागातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अद्यापही वर्ग सुरु झालेले नाहीत. इंटरनेट सुविधा, माहितीचा अभाव व मार्गदर्शनाचा अभाव या कारणांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची गंभीर बाब अॅड. कुरेशी यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم