नांदुरा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वाटर कूल आरो प्लांट पाण्याचे नमुने आरोग्य विभागामार्फत तपासण्यात यावे याची मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक श्री दारोकार साहेब यांनी दखल घ्यावी याबाबत निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा पेठकर




नांदुरा शहरातील नांदुरा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना खाजगीरित्या जवळपास दहा ते बारा वॉटर कुल आरो प्लांट चे पाणी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय चालू आहे शहरात गेल्या अनेक दिवसापासून पावसाळा असल्यामुळे व उन्हाळ्यात सुद्धा शहरातील अनेक नागरिकांनी पाण्याच्या चवीबद्दल आमच्या प्रतिनिधी स्वाभिमानी शिव संदेश यांच्याकडे शहरातील बरेच नागरिकांनी पाण्याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत 
नांदुरा शहरातील नगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षण अधिकारी व मुख्य प्रशासक साहेब यांनी नांदुरा शहरातील सर्व खाजगी वॉटर कूल प्लांटच्या सर्व पाण्याचे नमुने तपासणे व सदर नमुने बुलढाणा येथे लॅबमध्ये पाठवावे याबाबत नांदुरा नगरपालिकेचे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री मिलिंदजी दारोकार साहेब लोकप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने त्यांनी याकडे लक्ष केंद्रित करावे व नांदुरा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभाग व आरोग्य निरीक्षणाधिकारी आरोग्य विभाग नांदुरा यांच्या वतीने शहरातील सर्व आरो वाटर प्लांट च्या पाण्याचे नमुने घेण्यात यावे याबाबत नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व मुख्य संपादक स्वाभिमानी शिव संदेश सुरेश दादा पेठकर यांनी नगरपालिका मुख्य प्रशासक व बुलढाणा जिल्हा जिल्हाधिकारी साहेब व संबंधित अधिकारी वर्गाकडे एका नियोजन द्वारे मागणी केलेली आहे सदर मागणी नांदुरा शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची व जीविताची असल्याने याकडे संबंधित अधिकाऱ्याने लक्ष देऊन याची दखल घेणे गरजेचे आहे अशी मागणी करण्यात आलेली आहे यावर नगरपालिका आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभाग तसेच नगरपालिकेचे मुख्य प्रशासक यांनी दखल घ्यावी याबाबत नियोजन देण्यात आलेले आहे 

निवेदन कर्ता 
सुरेशदादा पेटकर पाटील 
मुख्य संपादक स्वाभिमानी शिव संदेश नांदुरा जिल्हा बुलढाणा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने