स्थान: नांदुरा, जिल्हा बुलढाणागैबी नगरमध्ये युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या विनंतीवरून तत्काळ साफसफाई – नगरपरिषदेकडून सकारात्मक कारवाई

दिनांक: १० जुलै २०२५
गैबी नगरमधील मुशर्रफ शाह यांच्या घरापासून ते मदिना मशीद जवळ फिरोज मिस्त्री यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर साचलेल्या चिखल–गाऱ्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी नगरपरिषद नांदुरा यांच्याकडे विनंती अर्जाद्वारे तात्काळ कारवाईची मागणी केली होती.

या विनंतीची तात्काळ दखल घेत, नगरपरिषद नांदुरा प्रशासनाने संबंधित ठिकाणी सफाई कामगार पाठवून संपूर्ण परिसरात स्वच्छता करून दिली. त्यामुळे शाळकरी मुलांना, महिलांना आणि नमाजासाठी जाणाऱ्या नागरिकांना आता सुरक्षित आणि स्वच्छ मार्ग उपलब्ध झाला आहे.
या तत्पर कारवाईबद्दल युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी नगरपरिषद प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले असून, भविष्यात देखील सामान्य जनतेच्या अडचणींवर असेच सकारात्मक प्रतिसाद मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

समाप्त
— आझाद पठाण
युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी
रा. गांधी चौक, नांदुरा
मो. 8625892288


إرسال تعليق

أحدث أقدم