मा.पोलीस अधीक्षक श्री.निलेश तांबे साहेब बुलढाणा, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.श्रेणिक लोढा साहेब, खामगाव. मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुधीर पाटील साहेब मलकापूर यांचे NDPS कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आज दिनांक 02/07/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे मार्गदर्शनाखाली सपळा कारवाई रचून मिळालेल्या खबरेप्रमाणे नांदुरा ते जळगांव (जामोद) रोडवर एक इसम त्याचे पाठीवरील बॅगमध्ये गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगुन आहे अशा मिळालेल्या माहितीवरून नांदुरा पोलिसांनी पंचासमक्ष छापा कारवाई करुन नांदुरा ते जळगाव जामोद रोड वरील लक्ष्मी नगर लेआऊट या भागातून आरोपी नामे योगेश सुरेश चौधरी वय ३७ वर्ष रा. कु-हा (काकोडा) ता. मुक्ताईनगर जि. जळगाव यास ताब्यात घेऊन त्याचे कब्जातून 1. एक केसरी रंगाचे पॉलीथीनमध्ये 5.263 किलोग्रॅम गांजा किमती 78,750/-रुपयेचा, 02. एक जुना वापरता एक निळ्या रंगाचा VIVO कंपणीचा अंन्ड्रॉईड मोबाईल फोन किमती 7000-रुपये, 03. एक जुनी वापरती बॅग किं.500/- रुपये असा एकुण 86,250/-रुपयेचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मानवी मेंदुवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 (एनडीपिएस / कॅनबीस) कलम 8 (क), 20 (ब), 22 (ब) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस गुण्यात अटक करण्यात आली आहे, सदर गुन्ह्याचा तपास सपोनि नरेंद्र पेंदोंर हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री.जयवंत सातव ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा, पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके, सह.पोलीस उपनिरीक्षक मिलिंद जंजाळ, पोहेका संदीप डाबेराव, कैलास सुरडकर, विनायक मानकर, राहुल ससाने, विनोद भोजने, सुनील सपकाळ, पंकज डाबेराव यांनी केली आहे.
Tags
नांदुरा