नांदुरा शहरातील मुख्य बाजारपेठ व रहदारीच्या भागांतील विद्युत वितरणासाठी वापरण्यात येणाऱ्या डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉईंट्स) अत्यंत जुने, जीर्ण व ओव्हरलोड झालेले असून, यामुळे शहरवासीयांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, ही जुनी यंत्रणा कोणत्याही क्षणी अपघातास कारणीभूत ठरू शकते.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेशदादा पेंठकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत ही सर्व ओव्हरलोड झालेली व निकामी डीपी तात्काळ बदलण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात जामा मस्जिद भागातील डीपी, पोलिस स्टेशन समोरील डीपी, तसेच पोल्ट्री फार्म रोडवरील डीपी यांचा विशेष उल्लेख असून, या ठिकाणी वारंवार होणारे तांत्रिक बिघाड व अपुर्या क्षमतेची उपकरणे यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
श्री. पेठकर यांनी प्रशासनास विनंती केली आहे की, शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी सदर सर्व डीपी अत्याधुनिक प्रणालीने त्वरित बदलण्यात याव्यात, जेणेकरून येणाऱ्या काळात अपघात टाळता येतील व अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित होईल.
Tags
नांदुरा