मारवाडी गल्लीतील नागरिकांना दिलासा; भाजपा नेते सुधीर भाऊ मुऱ्हेकर यांच्या प्रयत्नांना यश


नांदुरा – शहरातील मारवाडी गल्ली परिसरातील मोहीनी ज्वेलर्सजवळील जुना व खराब झालेला इलेक्ट्रिक पोल नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करत होता. या समस्येकडे नागरिकांनी वेळेवर लक्ष वेधले आणि तात्काळ भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ मुऱ्हेकर, शिवसेना शहरप्रमुख अनिलभाऊ जांगडे व माजी नगरसेवक राहुलभाऊ गोठी यांच्याकडे तक्रार केली.

या त्रयीने नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत, तत्परतेने महावितरण विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, नवीन पोल बसवण्यासाठी तात्काळ मागणी करण्यात आली. प्रशासनाने देखील प्रतिसाद देत नवीन इलेक्ट्रिक पोल तत्काळ बसविला, त्यामुळे संभाव्य अपघात व जीवितहानी टळली.

या कार्यामुळे मारवाडी गल्ली परिसरातील नागरिकांमध्ये मोठा आनंद व समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांनी सुधीर भाऊ मुऱ्हेकर, अनिलभाऊ जांगडे व राहुलभाऊ गोठी यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

भाजपा नेते सुधीर भाऊ मुऱ्हेकर यांची तत्परता, शिवसेना प्रमुख अनिलभाऊ जांगडे यांचे सहकार्य आणि माजी नगरसेवक राहुलभाऊ गोठी यांचा लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळेच ही समस्या तात्काळ सुटली, असे नागरिक म्हणाले.

या प्रसंगातून स्थानिक नेत्यांच्या जनतेप्रती असलेल्या संवेदनशीलतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم