वडजाई रोड अंडरपासजवळील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त – समाजवादी पार्टीने सदभाव टोलवे व्यवस्थापनास दिले निवेदन


दिनांक: 18 जून 2025



धुळे – शहरातील वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला वडजाई रोड अंडरपास परिसर व तेथील सर्विस रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. अंडरपासच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. यामुळे सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना आणि कब्रस्तान परिसरात येणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी धुळे महानगर समाजवादी पार्टीच्या शिष्टमंडळाने दिनांक 18 जून 2025 रोजी सोनगीर येथील "सदभाव टोलवे" व्यवस्थापनास निवेदन दिले. या निवेदनात टोलवे व्यवस्थापनाच्या निष्काळजी धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे.

समाजवादी पार्टीने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर अंडरपास परिसरातील खड्डे बुजवून त्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले नाही, तर टोलवे कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

या निवेदनप्रसंगी महानगर प्रमुख गुड्डूभाई काकर, जमील मंसूरी, अकिल अन्सारी, अमीन पटेल, गुलाम कुरेशी, इम्रान शेख, अकिल शाह, नविद अख्तर, निहाल अन्सारी, मोहसीन शेख, इरफान मनियार, नाजिम शेख, अली अझर खान, रशीद शहा, अब्दुल अजिज अन्सारी, अशपाक पिंजारी, इरफान शाह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

धुळे महानगर समाजवादी पार्टीने नागरिकांच्या समस्यांवर ठाम भूमिका घेत सदभाव टोलवे व्यवस्थापनास जबाबदार धरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


---

धुळे महानगर समाजवादी पार्टी


إرسال تعليق

أحدث أقدم