अनिलभाऊ जांगडे यांचा नवा उपक्रम — नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदार सातव सर यांचा सत्कार



नांदुरा (प्रतिनिधी) – शिवसेना (शिंदे गट) नांदुरा शहर अध्यक्ष अनिलभाऊ जांगडे यांनी एका स्तुत्य उपक्रमात नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये स्वतः जाऊन नुकतेच रुजू झालेले ठाणेदार जयवंत रघुनाथ सातव सर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या औपचारिक भेटीदरम्यान अनिलभाऊ जांगडे यांनी सातव सरांना नांदुरा शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका सांगितली आणि शहरातील शांतता, सुरक्षा व नागरिकांच्या हितासाठी शिवसेनेचं पूर्ण सहकार्य राहील, असा विश्वास दिला.

जयवंत सातव सर हे अनुभवी अधिकारी असून त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासह गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे शहरात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होईल, असा विश्वास अनिलभाऊ जांगडे यांनी व्यक्त केला.

यावेळी पोलीस ठाण्यात सौहार्दपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक नागरिक व शिवसेनेचे कार्यकर्तेही या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत आहेत.
पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार सातव सर यांचा सत्कार करताना अनिलभाऊ जांगडे.
शहराच्या सुरक्षेसाठी नागरिक आणि पोलिस यांचे सामंजस्य महत्त्वाचे — अनिलभाऊ जांगडे.



إرسال تعليق

أحدث أقدم