कर्तव्यदक्ष अधिकारी विलास पाटील यांचा सन्मान – जयवंत रघुनाथ सातव सर यांच्याकडे नांदुरा ठाण्याची धुरा



नांदुरा (प्रतिनिधी) –
कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवलेले विलास पाटील सर यांनी नांदुरा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर आता आपल्या पुढील सेवेसाठी स्थानांतरित झाले आहेत. त्यांच्या जागी जयवंत रघुनाथ सातव सर यांनी नव्याने ठाणेदार पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
विलास पाटील सर यांच्या काळात नांदुरा शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा ठाम बुरुज उभा राहिला होता. गुन्हेगारीवर नियंत्रण, सामाजिक सलोखा, तसेच महिलांवरील अत्याचारविरोधी कडक पावले उचलणे या बाबतीत त्यांची कारकीर्द सदैव स्मरणात राहणारी ठरली आहे. त्यांनी शहरात विश्वासाचं पोलीस प्रशासन निर्माण केलं आणि अनेक सामाजिक उपक्रमांतून पोलीस व जनतेत समन्वयाचा सेतू तयार केला.

नांदुरा पोलीस ठाण्याचे नवीन ठाणेदार म्हणून रुजू झालेले जयवंत रघुनाथ सातव सर हे देखील अनुभवसंपन्न व निष्णात अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांच्या रूपाने नांदुरा शहराला एक नवा, सजग आणि कायदाप्रेमी नेतृत्व लाभणार असल्याची खात्री व्यक्त केली जात आहे.

विलास पाटील सर यांचे योगदान नांदुरा नगरी कधीही विसरणार नाही. त्यांचं कार्य हे पुढील अधिकाऱ्यांसाठी एक प्रेरणास्रोत ठरेल. आणि जयवंत सातव सर यांच्या नेतृत्वात नांदुरा शहर आणखी सुरक्षित, सशक्त आणि प्रगतीशील होईल, अशी सर्वत्र अपेक्षा आहे.

– आजाद न्यूज


إرسال تعليق

أحدث أقدم