दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले!नांदुरा नगरपालिका सभागृहात 45 गरजू लाभार्थ्यांना दिलासा

नांदुरा, दि. 29 जून 2025 —
दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत ALIMCO, एस. आर. ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासन बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोजमाप आणि तात्काळ मोफत वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाला केंद्रीय युवककल्याण व क्रीडा राज्यमंत्री मा. ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांचे विशेष प्रयत्न लाभले असून, मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

स्थान: नगरपालिका सभागृह, नांदुरा
वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

या शिबिरात जिल्ह्यातील फक्त अस्थिव्यंग (हाडांशी संबंधित अपंगत्व असलेले) दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव बसविणे, कॅलिपर्सचे मोजमाप घेणे व तात्काळ मोफत वितरण करण्यात आले.
या उपक्रमाचा एकूण 45 दिव्यांग बांधव व भगिनींनी प्रत्यक्ष लाभ घेतला. या शिबिरामुळे अनेक गोरगरीब व लाचार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी नांदुरा व मलकापूर यांच्या वतीने करण्यात आले होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप नेते श्री. सुधीर प्रल्हादजी मोरेकर, तसेच भाजपा नांदुरा शहराध्यक्ष श्री. प्रमोदजी हिवाळे यांची विशेष उपस्थिती व मदत लाभली.

कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच ALIMCO, S. R. ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाचे आभार मानण्यात आले.
या उपक्रमामुळे दिव्यांगांच्या आत्मनिर्भरतेसाठी एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे, असे उपस्थितांनी नमूद केले.


अशाच उपक्रमांची गरज अधिकाधिक भागांत असून, या शिबिराचा आदर्श घेऊन इतर भागांतही अशी उपक्रमरचना होणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने