बुलडाणा -
गौणखनिज माफिया दिसेल त्या जमिनीतून जेसीबीच्या मदतीने अवैध उत्खनन करतात इतकेच नव्हे तर वन जमिनीतून देखील उत्खनन करण्याला ते धजावत नाही.भादोला वन बिट मध्ये मुरुमाचे अवैध उत्खनन केल्या प्रकरणी बुलडाणा वनविभागाने मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून अवैध उत्खनन करून मुरुमाची वाहतूक केल्याने 2 ट्रॅक्टर व 1 जेसीबी जप्त करण्यात आलं आहे.या कारवाई मुळे वन जमिनीतून अवैधरित्या गौण खनिजाचे उखनन करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
बुलडाणा वन परिक्षेत्र अंतर्गतच्या भादोला बिट मधील कक्ष क्र.523 मध्ये मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याची माहिती बुलडाणा वन विभागाला मिळाली.त्यानुसार डीएफओ जमीर शेख यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.एसीएफ वैभव काकडे,आरएफओ सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन शोध घेतला असता नवीन बांधलेल्या रोडचे साईट पट्टे भरण्यासाठी वन जमिनीतून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून आणल्याचे उघड झाले.या प्रकरणी आरोपींचा शोध घेऊन आरोपी महेश भीमराव जाधव वय 40 वर्ष,योगेश वसंतराव एकडे वय 41 दोघे रा.भादोला तसेच विजय रामा इटकर वय 31 रा.पिंपरखेड यांना अटक करून वन गुन्ह्यात वापरण्यात आलेले 2 ट्रॅक्टर ट्रॅली आणि 1 जेसीबी असा एकूण 19 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे.या प्रकरणी आरोपी विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.सदर कारवाई मध्ये वनपाल प्रदीप मुंढे,वन रक्षक नितेश गवई,समाधान झोटे,गजानन शिंदे, गजानन पोटे,विक्रम राऊत,बाळासाहेब घुले,वन मजूर रवींद्र तायडे,दीपक सोनुने,पवन मुळे, अमोल चव्हाण, प्रवीण सोनवणे यांचा सहभाग होता.प्रकरणाचा पुढील तपास वनपाल प्रदीप मुंढे करीत आहे.
Tags
बुलढाणा